Head Office: Pune, MH, INDIA

Office Hourse:

Mon-Sat: 9am to 7pm

Office

Parvati, Pune

About Us

placeholder.png

CEO & Managing Director

Mr. DNYANESHWAR GAIKWAD

Mr. Dnyaneshwar Gaikwad is a Managing Director at Blue Diamonds where he looks after wide range of activities including Manpower Training, Sales, Customer Service and Finance. Before launching his own venture in multiple services to residential & commercial properties he has a 10 years of experience in similar services.

His vision has helped the company to grow rapidly and has achieved significant position in the multiple services sector. Now Blue Diamond is spreading it’s wings with multiple services at multiple locations across Maharashtra.

Please Note Business Name Change: Dear Customers DI Blue Diamond is now Blue Diamond Services

मी ज्ञानेश्वर गायकवाड,

शिक्षण: बीए.
मी हा व्यवसाय 2009 पासून करत आहे. हा व्यवसाय निवडण्याचे कारण सुरक्षा क्षेत्रा विषयी आकर्षण आहे. मी मराठवाडा विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण होतो व मला माझ्या विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत.  त्या अनुषंगाने मी माझ्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये होतकरू व चांगल्या तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. सर्व सुशिक्षित बेरोजगार एकत्र येऊन मल्टी सर्विसेस देण्याच्या उद्देशाने ब्ल्यू डायमंड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे. आम्ही आमच्या कंपनीमार्फत रेसिडेन्शिअल व कमर्शियल ग्राहकांना लागणाऱ्या सर्व सेवा पुरवण्याचे काम करत आहोत. आमच्या कंपनीमध्ये आपापल्या क्षेत्रांमध्ये पारंगत असलेल्या व्यक्ती संचालक पदावर असल्यामुळे ग्राहकांना सर्विस मध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची मी ग्वाही देतो.

उद्दिष्टे:

ग्राहकांना माफक दरामध्ये कामगार उपलब्ध करून देणे व त्या कामगारांना ग्राहकाच्या मागणीनुसार प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी परांडा या ठिकाणी प्रशिक्षण संस्था उभारण्यात आलेली आहे.

ग्राहकांना जे कामगार पुरवले जातात त्या कामगाराची 100% गॅरंटी ही आमची कंपनी घेत आहे. तसेच त्या कामगाराची चारित्र्य पडताळणी करून त्याच्या पूर्व इतिहासाची माहिती घेतली जाते.

आमच्या कंपनीचे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस असणार आहे त्याच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण घेतलेले कामगार किंवा अकुशल कामगार यांना एकाच ठिकाणी एकत्र करून त्यांच्या योग्यतेनुसार काम मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

ग्राहकाला सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील.